उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरे मेट्रो कारशेडचा मुद्दा राजकीय प्रतिष्ठेचा का केला?

आरे कॉलनीत नियोजित असणारी मेट्रो कारशेड आता कांजूरमध्ये होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (12 ऑक्टोबर) यासंदर्भात घोषणा केली.

मेट्रो कारशेड, वृक्षतोड इत्यादी मुद्द्यांवरून फडणवीस सरकारच्या काळात आंदोलनं झाली होती. त्यावेळी आरे कॉलनीत मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांमध्ये शिवसेनाही होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय घेतल्याने फारसं आश्चर्य व्यक्त केलं जात नाही.

या कारशेडच्या निमित्तानं होत असलेल्या राजकीय टीकांचा मात्र अर्थ लावणं महत्त्वाचं आहे. याचं कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘अंहंकारा’चा मुद्दा उपस्थित केला, तर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या काळातही सत्तेचे वाटेकरी असल्यापासून कारशेड हलवण्याचं समर्थन केलं होतं. त्यामुळे हा मुद्दा केवळ मेट्रो कारशेडपुरता न राहता, राजकीय प्रतिष्ठेचाही बनला होता.

कारशेड हलवण्याचा निर्णय केवळ अहंकारातून – फडणवीस

आरेमध्ये जी कारशेड होणार होती, ती कारशेड आता कांजूरमार्गला होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

तसंच, कारशेड कांजुरला हलवल्यास खर्च वाढण्याची टीका आधीपासूनच केली जात होती. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “कारशेड हलवल्यास किंमत किती? जमिनीची किंमत कोण देणार? झालेला खर्च वाया जाणार का? त्याबाबतीत मी सांगतो, कांजूरची सरकारी जमीन शून्य रुपये किंमतीने मेट्रो कारशेडसाठी आपण दिली आहे आणि तिथे कारशेड उभारण्याचे आदेश मी काल दिले आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *