सुप्रिया सुळे आणि कुणाल कामराची भेट, राऊतांनंतर ‘शट अप या कुणाल’मध्ये सुळेंची मुलाखत?

संजय राऊत यांच्या मुलाखतीचं चित्रीकरण पार पडल्यानंतर स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी कुणालसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई : स्टॅण्ड कॉमेडियन कुणाल कामराने ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. त्यानंतर कुणालने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर करत, विथ कुणाल कामरा असं लिहिलं आहे. त्यामुळे आता ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये पुढच्या पाहुण्या सुप्रिया सुळे तर नाहीत ना अशीही चर्चा रंगली आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधील एका स्टुडिओमध्ये कुणाल कामरा यांनी घेतलेल्या संजय राऊत यांच्या मुलाखतीचं चित्रीकरण पार पडलं. या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते आणि या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे यावरही या मुलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. लवकरच सोशल मीडियावर या मुलाखतीचं प्रक्षेपण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *