Inauguration of Osmanabad Cyber ​​Police Station ‘*

*उस्मानाबाद सायबर पोलीस ठाण्याचे उदघाटन’*
गुरुवार, दि.15/10/2020

तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन, इंटरनेट द्वारे अनेक गुन्हे घडत आहेत. नकली फेसबुक खात्यावरून बदनामी करणे, मोबाईल धारकास OTP मागून खात्यातील पैसे हडपणे, खात्यातील पैसे ऑनलाईन पद्धतीने परस्पर काढून घेणे, खोट्या इ मेल द्वारे आमिष दाखवून खात्यावर पैसे मागून घेने, हॅकिंग, असे गुन्हे घडत आहेत.

यातील अज्ञात आरोपी हे चाणाक्ष असून जगभरात कोठेतरी ओळख लपवून राहत असतात. त्यांचा ठावठिकाणा शोधणे अवघड असते.
अशा गुन्ह्यांची उकल, तपास करण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ‘सायबर पोलीस ठाणे, कार्यरत आहे.
उस्मानाबाद सायबर पोलीस ठाणे हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील इमारतीत सुरू करण्यात आले असून या सायबर पोलीस ठाण्याचे उदघाटन आज गुरुवार दि. 15/10/2020 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक श्री ऋषिकेश रावळे, यांसह सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री साईनाथ ठोंबरे, API सचिन पंडित, PSI क्रांती ढाकणे यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *