इर्ला येथील पतीचा अहवाल पाँझिटीव्ह तर पत्नीचा इन्क्लूझिव्ह ; तेर येथून पाठवलेल्या 11 पैकी दोन अहवाल पाँझिटीव्ह

Anant Sakhare
Read Time:2 Minute, 40 Second
तेर-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रूग्णालयातून शुक्रवार दि 3 जुलै रोजी पाठविण्यात आलेल्या 11 स्वँबच्या नमुन्या पैकी इर्ला ता. उस्मानाबाद येथील एकजणाचा अहवाल पाँझिटीव्ह आला असून तर उस्मानाबाद येथील खोरी गल्लीत राहणा-या एका महिलेचा अहवालही पाँझिटीव्ह आला आहे. इर्ला येथील आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या पत्नीचा अहवाल इन्क्लूझिव्ह आला असून  आठ जणाचे तपासणी अहवाल प्रलंबित असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कोठावळे यांनी सांगितले.

इर्ला ता.उस्मानाबाद येथील महिलेस श्वसनाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी तेरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते या महिलेच्या स्वँबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आला. होता तो इनक्लुजीव्ह आला होता त्यानंतर या महिलेसह तिच्या पतीच्या स्वँबचे नमुने शुक्रवार दि.3 जुलै रोजी पाठविण्यात आले होते परंतु रविवार दिनांक 5 जुलै रोजी  त्यामध्ये पतीचा अहवाल पाँँजिटिव्ह आला आहे तर पत्नीचा अहवाल इनक्लुजीव्ह  आल्याने पत्नीचे स्वँबचे नमुने परत  पाठविण्यात येणार असल्याचे डॉ सचिन कोठावळे यांनी सांगितले
तर शुक्रवारी सांयकाळी तडवळा येथील 9 जणांचे नमुने तेर ग्रामीण रुग्णालयातून  पाठविण्यात आले होते.  त्यापैकी उस्मानाबाद येथील खोरी गल्लीत राहणारी  एक महिला पाँझिटीव्ह आली असून उर्वरित 8 जणाचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान इर्ला येथे कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत .
0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Abhijeet Patil elected as President of Solapur District Tractor Dealers Association.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली. कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या अडीआडचणीचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. तसेच आरटीओ च्या नियमाचे पालन करून ट्रॅक्टर […]