मोठी बातमी – ऍम्ब्युलन्सची गरज पडली तर वापर ही 'मोफत' सुविधा, उगाच पाच-दहा हजार देऊ नका…

M Marathi
Read Time:4 Minute, 23 Second

[ad_1]

मुंबई – कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकेबाबतच्या अनेक तक्रारी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला आल्या आहेत. रुग्णांचे नातेवाईक रुग्णवाहिकेसाठी अनेक तास ताटकळत राहिल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे रुग्णवाहिकेसाठी वॉर्डच्या वॉररूमध्ये फोन करुन मोफत सुविधा घेता येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. 

रूग्णवाहिकेच्या उपलब्धततेबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. खासगी रुग्णवाहिका दोन ते तीन किलोमीटर साठी 3 हजार 400 रुपये शुल्क आकारतात किंवा त्याहूनही अधिकचे पैसे आकारतात. हे शुल्क कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्य व्यक्तीला न परवडणारे आहे. त्यामूळे, यावर तोडगा काढावा म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत बैठक घेतली. त्या बैठकित रुग्णवाहिकेच्या उपलब्धततेबाबत चर्चा झाली. 

BIG NEWS – वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता… वाचा सविस्तर…

रुग्णवाहिकेची संख्या वाढणार – 

मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 5 ते 10 रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. 1916 या हेल्पलाईनला फोन करुन किंवा वॉर्डमधील वॉररुममध्ये फोन करुन रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली जाऊ शकते. खासगी रुग्णवाहिकेसाठी 4 ते 5 हजार खर्च होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत 500 रुग्णवाहिका मुंबईत उपलब्ध असुन त्यांची संख्या आणखी वाढून पुढच्या आठवड्यात आणखी 150 रुग्णवाहिका उपलब्ध होतील आणि त्यानुसार, 650 रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत अशी ही माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

व्हेंटिलेटरची संख्या ही वाढवणार – 

व्हेंटिलेटरची संख्या आणखी पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांना मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी केली जाणार आहे. किमान 500 व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

BIG NEWS – मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी

प्रयोगशाळेत चाचणीचे 2500 रुपये शुल्क – 

कोविड चाचणीसाठी 2200 आणि 2800 रुपये शुल्क आकारले जात आहे. मात्र, आता प्रयोगशाळेत जाऊन ज्यांना कोविड चाचणी करायची असल्यास 2500 रुपये शुल्क आकारले जातील. म्हणजे तीन प्रकारच्या दरांमध्ये कोविड चाचणी केली जाऊ शकते. 2200 रुपये हे फक्त नमुने रुग्णालयातून घ्यायचे असतील तर घेतले जातात. स्वतः प्रयोगशाळेत जाऊन चाचणी आणि रिपोर्टसाठी 2500 रुपये शुल्क आणि घरी येऊन टेस्ट आणि रिपोर्ट द्यायचा अस्ल्यास 2800 रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामूळे आता तीन दरांमध्ये कोविड टेस्ट केली जाऊ शकते असे ही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

call your ward office and dont pay hefty ambulance fees for ambulance says rajesh tope

[ad_2]
Source link

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

[ad_1] मुंबई : धारावी सारख्या दाट वस्तीतील कोविड संक्रमणावर नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. आता हाच प्रयोग संपुर्ण राज्यात राबविण्याचे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेत. धारावीची लोकसंख्या 6 लाखावर असून स्थालांतरीत कामगार मिळून ही संख्या 8 लाख 50 हजारावर जाते. यातील 6 लाखाहून अधिक नागरीकांची पालिकेने प्राथमिक […]