लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीच्या चेअरमनपदी रोहन देशमुख

M Marathi Editor
Read Time:1 Minute, 27 Second

उस्मानाबाद – लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून श्री.रोहन सुभाष देशमुख यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.
लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये मिळून सुमारे 105 शाखा कार्यरत आहेत. या मल्टीस्टेट सोसायटीची एक हजार कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे. या मल्टीस्टेट सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी रोहन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए. गावडे यांनी काम पाहिले. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.
यावेळी निवडण्यात आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे- अविनाश महागावकर, शिवाजी पाटील, देवीप्रसाद कुलकर्णी, शितल शहाणे, रणजित ढगे, पंडित लोमटे, बालाजी शिंदे, राजेंद्र अडगळे, प्रियांका साठे, सुधा अळीमोरे यांची निवड करण्यात आली.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता सुपूर्द

उस्मानाबाद :- कोरोना (कोविड 19) या साथरोगाच्या लढाईत समाजाची बांधिलकी या नात्याने पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुखीम सिद्दिकी, जनरल मँनेजर प्रशांत सुलाखे, व्यवस्थापक फिरोज शेख, ज्ञानेश्वर भोसले, संजय भुतेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी […]