Beating the family of a private lender; Filed a case of molestation against MNS taluka president

Anant Sakhare
Read Time:2 Minute, 49 Second

खाजगी सावकाराची कुटूंबीयास मारहाण ; मनसे तालुकाध्यक्ष विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

उस्मानाबाद – खाजगी सावकारकी करणाऱ्या मनसेच्या उमरगा तालुकाध्यक्षाने एका कुटूबास मरहाण करत माहिलेची छेड काढल्याचा प्रकार उमरगा येथे घडला असुन या प्रकरणी पडित महिलेच्या तुक्रारीवरुन मनसे तालुकाध्यक्षाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे .
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की , कोरेगाववाडी येथील महिला त्यांच्या कुंटूबासह राहतात . त्यांच्या पतीचा विटभट्टीचा व्यवसाय आहे . दि २३ रोजी रात्री ८ च्या सुमारास खाजगी सावकार तथा मनसेचे उमरगा तालुकाध्यक्षचा मुलगा हर्षद जाधव याने घरी येऊन त्यांच्या पतीस लक्ष्मी पाटीवर घेऊन गेला . तेथे मनसे तालुकाध्यक्ष हरिदास भानुदास जाधव , हर्षद हरिदास जाधव व निळकंठ भोसले यांनी त्यास पैस्याची मागणी करून धमकावत मारहाण सुरु केली . पतीचा फोन आल्याने फिर्यादी माहिला आपल्या दोन मुलासह लक्ष्मी पाटी येथे गेली . हरिदास जाधव पतीस घेतलेले पैसे दे असे म्हणत मारहाण करत असताना सोडवण्यासाठी मुलासह गेली असता मुलाला लोखंडी रॉडने डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले तर महिलेची साडी ओढत तीचा विनयभंग केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने दिल्यावरून वरील तीघांविरुध्द कलम ३५४ , ३२४ , ५०४ , ५०६ नुसार उमरगा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणाबाबत हरीदास जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार चुकीचा असुन मी फिर्यादी महिलेच्या कुटूंबातील व्यक्तीला उसने पैसे दिलेले आहेत ते बुडणार नाहीत माझ्याकडे त्यांचे चेक आहेत .मला शुगर व ब्लप्रेशरचा आजार आहे माझी तब्यत सध्या ठिक नाही. माझी तब्यत ठिक झाल्यावर मी माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत कायदेशीर दाद मागणार आसे असे सांगीतले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Prohibition order in Solapur district till July 31

सोलापूर जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश कोरोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असून 31 जुलै 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. हे आदेश नवीन […]