Blood donation of 69 heroes in Khanapur in Tuljapur taluka

M Marathi Editor
Read Time:2 Minute, 53 Second

तुळजापूर तालुक्यातील खानापूरमध्ये ६९ बहाद्दरांचे रक्तदान

खानापूर (प्रतिनिधी) खानापूर येथे माजी जि.प.सदस्य वसंत वडगावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तब्बल 69 बहाद्दरांनी रक्तदान केले. सध्या जगभरासह देशात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे.यामध्ये कोरोनाच्या व इतर रुग्णांना सध्या रक्ताची अत्यंत गरज भासत आहे.यामुळे सध्या रक्ताची नितांत गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांनी वाढदिवसानिम्मित इतर कार्यक्रम आयोजित न करता रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या भीषण परस्थितीत गावातील तब्बल ६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यामध्ये महिलांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती सामाजिक अंतराचे पालन करून शिबीर संपन्न करण्यात आले.

या रक्तदान शिबिरास नगराध्यक्ष सचिन रोचकरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,विक्रम देशमुख, माजी सभापती संतोष बोबडे,उपसभापती चित्तरंजन सरडे,माजी सभापती दीपक आलुरे, पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे,बाजार समिती संचालक अण्णा लोंढे,नारायण नन्नवरे,आनंद कंदले,राजकुमार पाटील,पिंटू मुळे,डॉ.जितेंद्र कानडे, दयानंद मुडके,बाजार समिती सभापती विजय गंगणे,राज पाटील,माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार,अरविंद पाटील,मल्लिनाथ जेवळे,राजाभाऊ सोनटक्के ,नागराज पाटील,मल्लू मोर्डे.अंगद जाधव,बाबा श्रीरामे,सरपंच उत्तम धुते,खंडू पावले,चिदानंद आरळे,शिवा बिराजदार,नूर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Arrival of Chhatrapati Shivaji Maharaj in Wakla.

छञपती शिवाजी महाराज यांचे वाकला नगरीत आगमन …… वैजापूर तालुक्यातील पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारे वाकला गाव आणि वाकला पंचक्रोशीतील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या छोट्याश्या वाकला नगरीत आगमन करून नागरिकांनी भव्य दिव्य असे स्मारक तयार करून स्थापित केले.तसेच वैजापूर तालुक्यातील आमदार प्रा.रमेश पा बोरनारे यांनी वाकला नागरिक […]