Case filed against unlicensed seed selling company and two sellers.

Anant Sakhare
Read Time:6 Minute, 5 Second

विनापरवाना बियाणे विक्री कंपनी व दोन विक्रेत्यावर गुन्हे दाखल.

उस्मानाबाद:- सालासर कृषि ॲग्रो, पिपलीयामंडी, मंदसौर ,मध्यप्रदेश उत्पादित व पतंजली बायो रिसर्च इन्स्टीटूट प्रा.लि.फुड हर्बल पार्क 8,पदार्था लष्कर रोड,हरिद्वार,उत्तराखंड यांनी विपनन केलेले सोयाबीन बियाणे वाण-जे.एस.335 महाराष्ट्र राज्याचा विक्रीचा परवाना न घेता विक्री केल्याचे आढळुन आल्याने संबधीत कंपनीवर तसेच कृष्णाई शेती विकास केंद्र जुने बस स्टॅड मेन रोड तेर व श्रीनिवास कृषि सेवा केंद्र,सुनिल प्लाझा उस्मानाबाद यांचे विरुध आनंदनगर पोलीस ठाणे उस्मानाबाद येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 04/06/2020 रोजी जिल्हास्तरीय भरारी पथकातील अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे कृषि विकास अधिकारी जिल्हा उस्मानाबाद ,ए.ए.काशीद कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, सी.जी.जाधव जिल्हा गुननियंत्रण निरीक्षक, उस्मानाबाद, व्ही.एस.निरडे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद,उस्मानाबाद, बी.आर.राऊत, कृ्‌षि अधिकारी पंचायत समिती,उस्मानाबाद यांनी तपासणी केली असता कृष्णाई शेती विकास केंद्र जुने बस स्टॅड मेन रोड तेर येथे सालासर कृषि ॲग्रो, पिपलीयामंडी, मंदसौर ,मध्यप्रदेश उत्पादित व पतंजली बायो रिसर्च इन्स्टीटूट प्रा.लि.फुड हर्बल पार्क 8,पदार्था लष्कर रोड,हरिद्वार,उत्तराखंड यांनी विपनन केलेले सोयाबीन बियाणे वाण-जे.एस.335 348 बॅग (30 किलो) ज्याची किंमत 9,22,000 रु.(प्रत्येकी 2650/-) आढळून आल्याने पंचनामा करुन विक्री बंद आदेश बजावण्यात आले. अशाच प्रकारचे सोयाबिन वाण-जे.एस. श्रीनिवास कृषि सेवा केंद्र, सुनिल प्लाझा, उस्मानाबाद या कृषि सेवा केंद्राची जिल्हास्तरीय भरारी पथकातील अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे कृषि विकास अधिकारी जिल्हा उस्मानाबाद, श्री.व्ही.एस.निरडे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद,उस्मानाबाद, श्री.बी.आर.राऊत, कृ्‌षि अधिकारी पंचायत समिती,उस्मानाबाद यांना तपासणी वेळी आढळून आल्याने 65 बॅग (30 किलो) ज्याची किंमत 1,72,250/- रु.(प्रत्येकी 2650/-) विक्री बंद आदेश बजावण्यात आले. याबाबत कृषि आयुक्तालयास पत्रव्यवहार करुन संबधित कंपनीस महाराष्ट्र राज्यात सोयाबिन बियाणे विक्रीचा परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता कृषि आयुक्तालय पूणे यांचेकडून संबधित कंपनीस महाराष्ट्र राज्याचा बियाणे विक्रीचा परवाना देण्यात आला नसल्याचे कळविण्यात आलेले आहे.
त्यामुळे सालासर कृषि ॲग्रो, पिपलीयामंडी, मंदसौर ,मध्यप्रदेश उत्पादित व पतंजली बायो रिसर्च इन्स्टीटूट प्रा.लि.फुड हर्बल पार्क 8,पदार्था लष्कर रोड,हरिद्वार,उत्तराखंड या कंपनीचे संचालक, उत्पादन व्यवस्थापक यांचे विरुध्द बियाणे कायदा 19666 चे कलम 2(8),2(9),2(11)(i) व कलम 5 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे खंड 3(1) व 5 तसेच श्रीनिवास कृषि सेवा केंद्र, सुनिल प्लाझा उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद या विक्री केंद्राचे प्रोपरायटर नेहा नवनाथ भोईटे रा.काकडे प्लॉट, ग्रामसेवक कॉलनी, उस्मानाबाद यांचे विरुध्द बियाणे कायदा 19666 चे कलम 2(8),2(9),2(11)(i) व कलम 5 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे खंड 3(1) व 5,6,7 व भां.द.वि कलम 420 तसेच कृष्णाई शेती विकास केंद्र जुने बस स्टँड मेन रोड तेर ता.जि.उस्मानाबाद चे प्रोपरायटर श्री.विजय शशिकांत सावंत यांचे विरुध्द बियाणे कायदा 19666 चे कलम 2(8),2(9),2(11)(i) व कलम 5 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे खंड 3(1) व 5 व भां.द.वि कलम 420 नूसार श्री.बी.आर.राऊत कृषि अधिकारी पं.स उस्मानाबाद यांनी सरकारतर्फे आनंदनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी.यु.मंगरुळकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली .

0 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

On Ashadi Ekadashi, local citizens of Pandhari should be allowed to visit Sri Vitthal

आषाढी एकादशीला पंढरीच्या स्थानिक नागरीकांना श्रीविठठ्ल दर्शनाची परवानगी दयावी-; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची मागणी यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर आषाढी यात्रा रद् झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक पंढरीत येणार नाहीत.त्यामुळे एकादशीच्या महापर्वास देवाला भक्तांवाचून रहावे लागणार असून त्यासाठी  किमान एकादशीस पंढरपूरकर नागरीकांना सोशल डिस्टसींगच्या नियमांचे […]