Chairman of Dharashiv Sugar Factory Hon. Celebrate the birthday of Abhijeet (Aba) Patil with various activities

Read Time:2 Minute, 42 Second

धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन मा.
अभिजीत (आबा) पाटील यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ४० गावामधील ग्रामपंचायत शिपाई, व आरोग्य सेविका, आशाताई, अंगणवाडी सेविका,यांचा कोविड योध्दा सन्मान करण्यात आला. तुमचं काम म्हणजे ईश्वर सेवेसारखे आहे. कोरोनाच्या काळात आपण स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लोकांना आधाराची खरी ताकद देत आहेत.

त्याच निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अभिजीत (आबा) पाटील मित्र परिवारांनी वाढदिवसानिमित्त काल देगाव या ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले तर आज सर्व ठिकाणी मिळून ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले .पुढील काही दिवस ही ठिकठिकाणी गावामध्ये रक्तदान आयोजित करण्यात गेले आहे असे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी सांगितले.

तसेच पंढरपूर तालुक्यातील वाखरी, देगाव, सुस्ते, उपरी, अजनसोंड,मगरवाडी,रोपळे, पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, चिंचणी, खेडभाळवणी, पळशी, नांदोरे, आव्हे यासह ४० गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सॅनिटायझर, मास्क वाटप, खाऊ वाटप, मातोश्री वृध्दाश्रम, पालवी, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम अशा विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले होते.

कोरोनाच्या संकटात नागरिकांना
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध गावात आर्सेनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप केले. कोरोनाच्या काळात ज्या आशा वर्कर , आरोग्य कर्मचारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जी कामगिरी बजावली त्यामुळे त्यांना भेटवस्तू सह कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपस्थित डिव्हीपी उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व मित्र परिवार यांनी कार्यक्रम यशस्वी पार पडला.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

A unique initiative on the occasion of the birth centenary of Lokshahir Annabhau Sathe on behalf of Dalit Federation

गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा केला सत्कार तसेच त्यांच्या माता पित्यांच्या देखील केला  यथोचित सन्मान सत्यशोधक जगविख्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून दलित महासंघ पंढरपूर तालुका युवा आघाडीच्या वतीने कासेगाव मठवस्ती येथे इ 10 वी 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा व […]