City council master plan to prevent corona infection; The mayor informed that an independent comprehensive committee has been formed for the ward

Anant Sakhare
Read Time:3 Minute, 2 Second

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगर परिषदेचा मास्टर प्लॉन ; प्रभागासाठी स्वतंत्र सर्वसमावेशक कमीटी बनवल्याची नगराध्यक्षांची  माहीती
उस्मानाबाद – कोव्हिड -19 चा प्रसार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून शहरामधील 19 प्रभागांमध्ये प्रभाग वाईज समिती स्थापन करण्यात आली आहे व या प्रत्येक समितीचे अध्यक्ष त्या प्रभागातील पुरूष नगरसेवक व सचिव त्या प्रभागातील स्त्री नगरसेवक असुन त्यांच्या सोबत नगर पालिकेतील सर्व विभागातील 10 कर्मचारी , 1 अध्यक्ष, 1एक सचिव असे मिळून 12 सदस्य एका समिती मध्ये आहेत.अशा प्रकारे प्रत्येक प्रभागात 1 समिती तयार करण्यात आली आहे. अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे .उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने पुर्वीपासुनच वेगवेगळ्या उपाय योजना राबवल्या . नगराध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी धडक निर्णय घेतले मात्र अनलॉकच्या काळात बाधितांची संख्य वाढतच आहे त्यामुळे नगर परिषदेने माष्टर प्लॉन तयार केला असुन प्रत्येक प्रभागासाठी पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या स्वातंत्र समीतीची निर्मीती केली आहे . या समित्याद्वारे संपुर्ण शहरामध्ये घरोघरी जाऊन ऑक्सिमीटर व थर्मामीटर द्वारे दर 4-5 दिवसांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी करण्यासाठी प्रत्येक समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे 20 ऑक्सिमीटर व 20 थर्मामीटर, सॅनिटायजर, मास्क, हॅन्डग्लोज , फेससिल्ड याप्रमाणे अवश्यकतेनुसार लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या पुढील काळामध्ये कोव्हिड 19 संदर्भात नगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या विविध उपायोजना या स्थापन केलेल्या समित्याद्वारे राबवण्यात येणार आहे. अशा पध्दतीने काम करून नगर पालिका कोव्हिड 19 ला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहीती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे .

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Twenty increases in corona obstructions; Number of victims 573

कोरोना बाधीतांमध्ये वीसची भर ; बाधितांचा आकडा 573 उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज त्यात तब्बल 20 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने भर पडली असुन एकुण बाधितांची संख्या 573 वर पोहचली आहे तर 28 जणांचा मृत्यु झाला आहे . जिल्ह्यात उस्मानाबाद शहरात 9 तर तालुक्या एकुण 11 रुग्ण […]