Coronavirus: Dexamethasone proves first life-saving drug कोरोना : जीवनरक्षक बनू शकतं ‘डेक्सामेथाझोन’

M Marathi
Read Time:12 Minute, 0 Second

[ad_1]

मुंबई : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायसर या महामारीवरील उपचाराबाबत एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. संशोधनात असा खुलासा झाला आहे की Covid-19 रूग्णांवर जेनेरिक स्टेरॉयड डेक्सामेथासोन (Dexamethasone)औषधाची संक्रमण रोखण्यासाठी मदत होत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मृत्यदर रोखण्यासाठी एक तृतीयांश मदत होत आहे. यामुळे कोरोना व्हायरसच्या विरोधात हे मोठ यश म्हणावं लागेल. या क्लिनिकल ट्रायलला ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी यांला Recovery असं नाव दिल आहे. 

संशोधकांच्या मते, या औषधाचा वापर कोरोना व्हायरसशी संक्रमीत असलेल्या रूग्णांच्या प्राथमिक उपचारात केला जाणार आहे. 

क्लिनिकल ट्रायल करत असलेल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक मार्टिन लँड्रे यांनी सांगितलं की, Covid-19 चा रूग्ण जो व्हेंटिलेटर अथाव ऑक्सिजनवर असेल. त्याला उपचारादरम्यान जर डेक्सामेथाझोन दिलं जातं तर तो रूग्ण वाचण्यास मदत होते. त्याचप्रमाणे याकरता कमी खर्च लागणार आहे. 

अशी होते डेक्सामेथाझोनची मदत 

शरीरावरील सूज कमी करण्यासाठी इतर आजारांवर डेक्सामेथासोनचा वापर केला जातो. डेक्सामेथासोन ही एक सामान्य स्टेरॉइड आहे. कोरोनाशी लढताना शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशावेळी डेक्सामेथाझोन शररीचं नुकसान थांबवण्यासाठी मदत होते. 

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी कोरोना व्हायरस रूग्णांना लगेचच डेक्सामेथाझोन द्यायला सुरूवात केली आहे. तीन महिन्यापासून या ड्रगच्या क्षमतेची चाचणी सुरू होती. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका चाचणीत हॉस्पिटलमधील २००० रुग्णांना डेक्सामेथाझोन औषध देण्यात आलं आणि त्यांची तुलना हे औषध न दिलेल्या ४००० जणांसोबत करण्यात आली. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या धोक्यात ४० टक्के ते २८ टक्के घट झाली. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या धोक्यात २५ टक्के ते २० टक्के घट झाली. मुख्य संशोधक प्रा. पीटर हॉर्बी यांच्या मते, “आतापर्यंत हे एकमेव औषध आहे, ज्यामुळे मृत्यूदर कमी झालाय आणि तेही अत्यंत लक्षणीयरीत्या. ही अत्यंत महत्त्वाची प्रगती आहे.”[ad_2]
Source link

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नवीन वर्षात POSITIVE राहण्याचे पाच सोप्पे उपाय

[ad_1] मुंबई : यंदाचं वर्ष मागे सरतंय… नवीन वर्ष सुरू होतंय… तुमचे अनेक संकल्पही नवीन वर्षाच्या निमित्तानं सुरू झालेच असतील. नवे दिवस, नवे महिने, नवे ऋतू आणि बरंच काही… येणाऱ्या दिवसांचा खऱ्या अर्थानं आनंद लुटण्यासाठी तुम्ही सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे… आणि त्यासाठी फार काही मेहनत घ्यायचीही गरज नाही. अगदी […]