Extension of payment for crop insurance including acceptance of offline insurance – MLA Rana Jagjit Singh Pati

Anant Sakhare
Read Time:3 Minute, 4 Second

ऑफलाइन विमा स्विकारण्यासह पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी -आ.राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद – ऑनलाइन ७/१२, ८अ उतारे दिसून येत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्या पासून वंचित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास १५५ गावांमधून ८५० शेतकर्‍यांनी त्यांचे ७/१२, ८अ उतारे ऑनलाइन दिसत नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. तर अशाच अडचणीत असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी तक्रारी केलेल्या नाहीत. या अगोदर काही गावे ऑनलाइन दिसत नसल्यामुळे व कोरोंना संकटातील आर्थिक अडचणीमुळे शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यास विलंब झाला आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे ऑफलाइन विमा स्विकारण्यासह पीक विमा भरण्यास १५ दिवसाच्या मुदतवाढ देद्णेबाबत केंद्र सरकारला विनंती करावी तसेच तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑफलाइन पीक विमा हप्ता स्वीकारण्यास विमा कंपन्यांना आदेशीत करावे अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.

ऑनलाइन ७/१२, ८अ उतारे न दिसणे व इतर कारणांमुळे आजही जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरणे बाकी आहेत. ७/१२, ८अ चा विषय एक दोन दिवसात मार्गी लागला तरी देखील शेवटी होणार्‍या गर्दीमुळे सर्व्हर वर लोड आल्याने सर्व्हर डाऊन होण्याचा संभव आहे.

त्यामुळे या सर्व अडचणींचा विचार करून राज्यातील एकही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यासाठी पीक विमा हप्ता भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देणेबाबत केंद्र सरकारला विनंती करावी, तसेच महसूल यंत्रने कडून महिती मागवून, ज्या गावांमध्ये ऑनलाइन ७/१२, ८अ बाबत अडचणी आहेत, त्या गावातील शेतकर्‍यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ऑफलाइन पीक विमा हप्ता स्वीकारण्यास संबंधित विमा कंपनीला आदेशीत करावे, अशी मागणी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Shreya Bhosale as the District President of NCP Yuvati Congress

जिल्हातील युवती महिलांच्या न्यायहक्कासाठी उपक्रम राबविणार… सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापुर जिल्हाअध्यक्ष पदी श्रीया भोसले यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर यांनी निवड केली.. जिल्हातील युवती महिला सक्षम होण्यासाठी गाव तिथे महीला सक्षम झाली पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबवुन जिल्हात युवती महिलांची ताकद वाढवणार असुन युवती महिलांना रोजगार […]