Follow the cautionary mask and social distance, otherwise action will be taken by Mayor Sachin Rochkar.

Read Time:4 Minute, 39 Second
  • खबरदार मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन करा अन्यथा होणार कारवाई नगराध्यक्ष सचिन रोचकरी

तुळजापूर प्रतिनिधी: नगर परिषद वतीने तुळजापूर शहरांमध्ये 22 जुलै ते 26 जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलं होतं जनता कर्फ्यू चा कालावधी पूर्ण होतात 27 जुलै रोजी सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या. जनता कर्फ्यू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिंग चा पूर्ण फज्जा तुळजापूर मध्ये उडताना दिसला
शहरातील सर्वत्र पहिल्या दिवशी सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाल्या चा दिसला शहरातील हाडको बाजार परिसरांमध्ये तसेच शहरातील आंबेडकर चौक बस स्थानक परिसर समोर उस्मानाबाद रोड या सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंग होत नसल्याचे दिसून आली नागरिकांना आठवडाभर भाजीपाला उपलब्ध नसल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी भाजीपाल्यास गर्दी करण्यास सुरुवात केली परंतु भाजी खरेदी करत असताना किंवा भाजी विक्री करत असताना पूर्ण सोशल डिस्टंसिंग फजा उडण्याचा दिसून आला. भाजी मार्केटमध्ये एकदा यात्री सारखं स्वरूप आलं होतं अनेक दुकानदार मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना पण दुकानदार आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून आले. नागरिक मात्र बाजारपेठ मध्ये खुलेआम विदाऊट मास्क फिरताना दिसत होती. प्रशासन दिवसेंदिवस कोरोना आकडा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु नागरिक मात्र प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करताना दिसत नसल्याचे दिसत आहे याचा संपूर्ण भार प्रशासनावर पडत आहे दुकानदार तसेच नागरिक हे सोशल डिस्टंसिंग केलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये कोरोना साखळी तोडण्यास खऱ्या अर्थाने प्रशासनास यश येईल.

याबाबत आम्ही नगराध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता नगराध्यक्ष यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली की जनता कर्फ्यू कालावधी संपल्यानंतर आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती. परंतु प्रशासनाने नियोजन केले आहे मंगळवार पासून शहरात दुकानदार व नागरिकांवर कडक कारवाही करण्यात येणार आहे. सर्व दुकानदार यांना सूचना देऊन दुकानाबाहेर बेरीकटिंग करणे तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे हे सर्व केले जाणार आहे. नागरिकांनी मास्क वापर करावा नागरिकांनी मास्क वापरत नसल्यास दिसल्यास नगरपरिषद यांच्याकडून दंडात्मक कार्यवाही करून दंड वसूल केला जाईल तसेच दुकानदार यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे . याबाबत एक कमिटी तयार करण्यात आली आहे अन्यथा त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई होणार असल्याची नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले .

तुळजापुर शहरातील नागरिकांनी पाच दिवसांचा लॉकडॉउन पाळला परंतु आज भाजीपाला खरेदीसाठी हजारोंच्या संख्येने नागरीक बाहेर पडले त्यात सोशल डीस्टंन्स पाळला जात नाही हे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खुप धोकादायक आहे प्रशासनाने प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण व सोशल डीस्टंन्स साठी उपाययोजना करने गरजेचे आहे

अॅड धिरज जाधव

.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Extension of payment for crop insurance including acceptance of offline insurance - MLA Rana Jagjit Singh Pati

ऑफलाइन विमा स्विकारण्यासह पीक विमा भरण्यास मुदतवाढ द्यावी -आ.राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद – ऑनलाइन ७/१२, ८अ उतारे दिसून येत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विमा भरण्या पासून वंचित आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास १५५ गावांमधून ८५० शेतकर्‍यांनी त्यांचे ७/१२, ८अ उतारे ऑनलाइन दिसत नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. […]