India China FaceOff: भारतीय जवानांकडे शस्त्रं होती, पण…; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितली ‘फॅक्ट’

M Marathi
Read Time:2 Minute, 18 Second

गलवान खोऱ्यातील भारताचा एकही जवान निशस्र नव्हता, मात्र करारानुसार तिथे हत्यारांचा वापर करता येणार नव्हता आणि त्यानुसार तो केला गेला नाही

नवी दिल्ली – लडाख येथील गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांसमोर भारताच्या जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आले होते, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींनी केलेला आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. गलवान खोऱ्यातील भारताचा एकही जवान निशस्र नव्हता, मात्र करारानुसार तिथे हत्यारांचा वापर करता येणार नव्हता आणि त्यानुसार तो केला गेला नाही. असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले की, आपल्याला वास्तव समजून घेतले पाहिजे. सीमेवर कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक जवान शस्त्रसज्ज असतो. आपली चौकी सोडत असताना सर्व जवान आपली शस्त्रे सोबत घेतात. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांजवळसुद्धा शस्त्रे होती. चिनी सैनिकांशी हिंसक झटापट झाली, तेव्हा हत्यारांचा वापर न करण्याबाबतचा आदेश स्पष्ट होता. सीमेवर झालेल्या तणावावेळी हत्यारांचा वापर करायचा नाही हा नियम भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून चालत आला आहे. १९९६ आणि २००५ मधील करारांनुसार ही परंपरा पाळली जात आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीच्या चेअरमनपदी रोहन देशमुख

उस्मानाबाद – लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून श्री.रोहन सुभाष देशमुख यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये मिळून सुमारे 105 शाखा कार्यरत आहेत. या मल्टीस्टेट सोसायटीची एक हजार कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे. या मल्टीस्टेट सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली […]