Javaya’s birthday is well prepared in Sasarwadi!

Anant Sakhare
Read Time:4 Minute, 17 Second

जावयाच्या वाढदिवसाची सासरवाडीत जय्यत तयारी !

उस्मानाबाद – राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांचा आज वाढदिवस असुन उस्मानाबाद तालुक्यातील तेर ही त्यांची सासरवाडी . डॉ पाटील पिता – पुत्राच्या पक्षांतरानंतर खुद् त्यांच्याच गावात म्हणजे सासरवाडीत विशेषता: शिवसेना खासदार , आमदाराच्या उपस्थितीत वाढदिवसानिमीत्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे .
उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे जितके ऐतिहासीक दृष्या महत्वाचे आहे तितकेच राजकिय दृष्ट्या देखील महत्वाचे आहे . राजकारणात डॉशिंग नेता म्हणुन राज्यभर प्रसिद्ध असलेल्या डॅा पद्मसिंह पाटील यांचे मुळ गांव म्हणजेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांची सासरवाडी . पाटील पिता – पुत्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात असताना गमतीने तेरला राजधानी म्हणत . जिल्ह्याची सर्व सुत्रे त्यांच्याकडेच होती . प्रत्येक वर्षी अजितदादांच्या वाढदिवसानिमीत्त तेर नगरीत काही प्रमाणात शुभेच्छांचे बॅनर व कार्यक्रमदेखील थोडयाफार प्रमाणात होत असत मात्र पाटिल पिता – पुत्राच्या पक्षांतरानंतर प्रथमच तेही पाटील घराण्याचे कट्टर विरोधक शिवसेनेचा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व एके काळी राणा पाटिल प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते असलेल्या व शिवसेना प्रवेशानंतर आमदार झालेल्या कैलास पाटील यांच्या उपस्थितीत जंगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे . कै . अमरसिंह पाटील मित्रमंडळ व अ रहेमान काझी मित्रमंडळाच्या वतीने गुरवार ( दि २३ ) रोजी ना अजितदादा पवार , ना धनंजय मुंडे व खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या एक त्र वाढदिवसाचे अवचित्त साधुन मोठया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . तेरमधील सर्व खाजगी व शासकिय वैद्यकिय कर्मचाऱ्यांना पीपीई किट , सर्व अंगणवाडी कार्यकत्या , मदतनिस व आशाना फेस शिल्ड, मास्क , ग्लोज , सॅनिटायझर . सर्व पत्रकारांना रेनकोट व कोरोना प्रतिबंधक साहित्य , ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांना अॅक्सीमिटर , टेंम्परेचर मिटर व कोरोना प्रतिबंधक साहित्य देऊन त्यांचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान करण्यात येणार आहे . हा कार्यक्रम महाराष्ट्र संत विद्यालयात गुरुवारी सकाळी ९ : ३० वाजता राष्ट्रवादी कॉग्रेस , कॅग्रेस , शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित कोरोनाचे सर्व नियम पाळत सपन्न होणार आहे . या सोबतच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . पक्षांतरानंतर प्रथमच जावयाचा वाढदिवस सासरवाडीत साजरा होत असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Follow the cautionary mask and social distance, otherwise action will be taken by Mayor Sachin Rochkar.

खबरदार मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन करा अन्यथा होणार कारवाई नगराध्यक्ष सचिन रोचकरी तुळजापूर प्रतिनिधी: नगर परिषद वतीने तुळजापूर शहरांमध्ये 22 जुलै ते 26 जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलं होतं जनता कर्फ्यू चा कालावधी पूर्ण होतात 27 जुलै रोजी सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या. जनता कर्फ्यू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोशल […]