My soldier’s son became the Deputy Collector Arun Unde felicitated on behalf of Tuljapur Taluka Press Association

M Marathi Editor
Read Time:3 Minute, 36 Second

माझी सैनिकाचा मुलगा झाला उप जिल्हाधिकारी

अरुण उंडे यांचा तुळजापूर तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार

तुळजापूर :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातुन उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील अरूण विलास उंडे यांचा तुळजापुर येथील पत्रकार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नुकत्याच आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या अरुण उंडे यांचा पत्रकारांच्या वतीने पत्रकार श्रीकांत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्रसंगी पत्रकार डॉ. सतिष महामुनी, गुरुनाथ बडुरे, गोविंद खुरुद, सचिन ताकमोघे,संजय खुरुद, अनिल आगलावे, कुमार नाईकवाडी, कुमारी किरण चौधरी, ज्ञानेश्वर गवळी, सिद्धीक पटेल, अमीर शेख प्रमोद कावरे यांची उपस्थिती होती

तुळजापूर येथील सैनिक विद्यालय मध्ये संपूर्ण शालेय शिक्षण घेतल्यानंतर अकरावी आणि बारावी आपण लातूरला न करता ते शिक्षण सैनिकी विद्यालया मध्येच पूर्ण केले त्यानंतर तेरणा महाविद्यालय येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले असे सांगून मनामध्ये उपजिल्हाधिकारी होण्याची चिंता सुरुवातीपासून होती या अगोदर दोन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालो परंतु उपजिल्हाधिकारी या पदावर काम करण्याची चित्र असल्यामुळे तिसऱ्या वेळेस यश संपादन केले आहे अशा शब्दात सत्कारमूर्ती अरुण उंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मागील पाच वर्षातील प्रश्नपत्रिका याचे अवलोकन करून आपल्या मनामध्ये विषयाचा परीक निर्माण करावा तसेच कोणताही क्लास हे सर्वस्व नसून स्वतःची तयारी खूप महत्त्वाची आहे सर्वसाधारणपणे चार ते आठ तास सलग अभ्यास करून यश संपादन करता येते या सर्व घडामोडींमध्ये आपला विश्वास आणि मनाची जिद्द तसेच उद्दिष्ट निश्चित असले पाहिजे असेही उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाल्यानंतर अरुण उंडे यांनी तुळजापुरातील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गुरुनाथ मोरे यांनी प्रास्ताविक केले श्रीकांत कदम, सतीश महामुनी, किरण चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांनी आभार मानले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Corona Great Warrior Award to Sachin Takmoghe

*सचिन ताकमोघे यांना कोरोना महायोद्धा पुरस्कार* तुळजापूर :- संपूर्ण जग आज कोरोनाविषाणू शी लढत आहे अशा संसर्गजन्य  कठीण प्रसंगी आपले कुटुंब आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून व आपला जीव धोक्यात घालून  केवळ सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, शहरासाठी, तालुक्यासाठी, समाजासाठी, आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावून  उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल म्हणुन पञकार सुरक्षा समितीच्या […]