On Ashadi Ekadashi, local citizens of Pandhari should be allowed to visit Sri Vitthal

Read Time:5 Minute, 21 Second

आषाढी एकादशीला पंढरीच्या स्थानिक नागरीकांना श्रीविठठ्ल दर्शनाची परवानगी दयावी-;
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची मागणी

यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर आषाढी यात्रा रद् झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने येणारे भाविक पंढरीत येणार नाहीत.त्यामुळे एकादशीच्या महापर्वास देवाला भक्तांवाचून रहावे लागणार असून त्यासाठी  किमान एकादशीस पंढरपूरकर नागरीकांना सोशल डिस्टसींगच्या नियमांचे पालन करीत श्रीविठठ्लाचे दर्शन घेण्याची परवानगी दयावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी श्रीविठठ्ल रुक्मीणी मंदिर समिती कडे केली आहे.

प्रतिवर्षी आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरात येत असतात.या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे एकादशी दिवशी श्रीविठठ्लाच्या दर्शनासाठी २५ ते ४0 तास लागतात याचा मोठा ताण पंढरपूर शहरावर व मंदिर समितीवर येत असतो स्थानिक नागरीक यात्रा कालावधीत आपल्या धंदा उदयोगात व्यस्त असतो. तसेच आलेल्या भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून स्थानिक नागरीक आषाढी झाल्यावर दर्शनास जातात. आषाढी एकादशीला श्रीविठठ्लाचे दर्शन घेणे स्थानिक भाविकांना कधिही शक्य होत नाही  मात्र यंदा आषाढी यात्राच होणार नसल्याने श्रीविठठ्लाचे मंदिर सुनेसूने पडणार आहे.त्यामुळे यंदा १ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीस स्थानिक भाविकांना श्रीविठठ्ल दर्शनासाठी परवानगी दयावी.
पंढरीचा पांडुरंग हा युगेंनयुगे भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून उभा आहे.भक्त आले नाहीत तर देवालाही करमत नाही.कोरोना मुळे गेले तीन महीने भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने कोणत्याही भाविकाला आपल्या प्रिय देवाचे दर्शन घेणे शक्य झालेले नाही त्यामुळे देव बैचेन झाला असेल. भाविकांच्या दृष्टीने आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे.या पवित्र व महत्वाच्या दिवशी आषाढीला बाहेरच्या लोकांसाठी पंढरपूरचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत त्यामुळे देवाला भक्तांपासून दूर ठेवण्याचे काम प्रशासनाला करावे लागत आहे.श्रीविठठ्लाच्या कृपेने पंढरपुर कोरोना पासून मुक्त आहे त्यामुळे रिकाम्या असणाऱ्या पंढरीच्या नागरीक भक्तांना तरी विठुरायाचे दर्शन घेवु दयावे अशी आपली मागणी असून दर्शनासाठी गर्दी होवु नये म्हणून शहराचे प्रभागा प्रमाणे भाग पाडून प्रत्येक भागाला ठरावीक वेळ देण्यात यावी त्यासाठी मास्क वापरुन,सोशल डिस्टसींगचे नियम पाळणे  व सॅनिटायझरचा वापर करुन व स्थानिक भाविकांचे पंढरपूरचे रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड बघुनच दर्शनासाठी सोडण्यात यावे अशी मागणी दिलीप धोत्रे यांनी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.या प्रसंगी मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड ,मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष नागेश इंगोले, सिध्देश्वर गरड व समाधान डुबल ऊपस्थित हौते.

【एकादशी दिवशी बाहेरचे भाविक पंढरीत येणार नसल्याने स्थानिक भाविकांना दर्शनासाठी सोडावे,तरी स्थानिकांना आषाढी एकादशीला दर्शन मिळण्याची मोठी संधी चालून आली आहे.दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मास्क,सॅनिटायझर व हॅन्डग्लोज पुरविण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेत आहे.

——दिलीप धोत्रे सरचिटणीस महाराष्ट्र मनसे 】

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

As the President of Tuljapur Rotary Club, Adv. Selection of Nalegaonkar and Jadhav as Secretary.

तुळजापूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अॅड. नळेगांवकर व सचिवपदी जाधव यांची निवड. तुळजापूर -( प्रतिनिधी ) तुळजापूर स.न.२०२०-२०२१ या वर्षा करिता रोटरी क्लब च्या अध्यक्ष पदावर अॅड.नळेगावकर मॅडम तर सचिव पदावर सौ. निर्मला जाधव यांची निवड झाली आहे. तुळजापूर रोटरी क्लब च्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष व सचिव पदावर महिला विराजमान झाले […]