One dry day a week should be observed: – Umesh Paricharak

M Marathi Editor
Read Time:5 Minute, 27 Second

आपण सर्वजण मिळुन साथीच्या आजाराला रोखू या :-
आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळावा :-
उमेश परिचारक

पंढरपूरमध्ये परदेशीनगर ते माळी वस्ती या भागाचा कंटेनर सर्व्हे करण्यात आला. युटोपियन शुगर लि.चेअरमन उमेशराव परिचारक, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, हिवताप अधिकारी किरण मंजुळ,उमाकांत सगरे, संजय देशमुख यांच्या उपस्थितीत सर्व्हे करण्यात आला. यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी निदर्शनात आल्या. बऱ्याच घरगुती पाणी साठ्यामध्ये डासाच्या आळ्या दिसून आल्या. घराबाहेरील कुंडीमध्ये, टिपामध्ये, फ्रिजच्या पाठीमागे डासांच्या आळ्या,अंडी निदर्शनास आली. काही ठिकाणी तर पांढऱ्या एडीस डासाच्या आळ्या आढळून आल्या. वास्तविक पाहता ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात अशा प्रकारच्या डासांची उत्पत्ती होते. यामुळे आपण वेळीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे श्री उमेश परिचारक यांनी सांगितले. पावसामुळे साठलेल्या पाणी साठ्यामध्ये अँटिबायोलॉजीकल उपाययोजना करण्यात येत आहेत.त्याचाच भाग म्हणून साचलेल्या पाणीसाठ्यामध्ये फवारणी करण्यात येत आहे.तसेच ज्या ठिकाणी पाणी सोडुन देणे शक्य नाही अशा टाकी मध्ये अँटीबायोटीक औषधे टाकण्यात आली. रोटेशन पद्धतीने पूर्ण पंढरपूरमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जीवशास्त्रीय उपाययोजनेवर भर देण्यात येत आहे.परदेशीनगर मधील सिमेंटच्या हौदात व गणेशनगर पाण्याच्या टाकी खालील हौदात गप्पी मासे सोडण्यात आले असून, नागरिकांनाही जीवशास्त्रीय उपाययोजनेचे महत्व सांगण्यात आले व ज्याच्या घरात किंवा परिसरात गप्पी मासे सोडण्यासाठी व्यवस्था आहे त्यांनी गप्पी मासें देण्यात येतील,असे श्री उमेश परिचारक यांनी सांगितले, मागणीनुसार नागरिकांनाही गप्पी मासे देण्यात आले.
माळी वस्ती भागात ड्रेनेजचे काम थोडे राहिले होते,या ठिकाणी भेट देऊन लवकरच काम पुर्ण होणार असल्याचे श्री उमेश परिचारक यांनी सांगितले.आरोग्य समिती सभापती श्री विवेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभाग व नागरी हिवताप विभागात चैतन्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कोरोनाचे संकट अजुन टळले नाही,अशा वेळी डेंग्यूसाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळुन कोरोना वर मात करत आहोतअसेही त्यांनी सांगितले.नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सांगितले की डांसांची निर्मिती रोखणे हा सर्वोत्तम उपाय आहे.नागरिकांनीही यामध्ये सहकार्य करावे असे सांगितले. आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की ईचलकरंजी मधील नगरसेवकाशी संपर्क केला असता. ईचलकरंजीमध्ये डेंग्यूचे पेशंट सापडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले असून साधारण ८ ते १० ऍक्टिव्ह डेंग्यूचे पेशंट असल्याचे सांगितले. पंढरपूर पॅटर्न हा आदर्श पॅटर्न असून समस्या तयार होण्यापुर्वी आपण अभ्यास करुन उपाययोजना करत असल्याचे सांगितले. डास उत्पत्ती रोखण्यासाठी आपण सर्वजण सतर्क राहुयात आणि आपला परिसर आरोग्यदायी राखूयात असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, गटनेते गुरुदास अभ्यंमकर, नगरसेविका सुप्रिया डांगे नगरसेवक विक्रम शिरसट, राजु सर्वगोड , संजय निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते इब्राइम बोहरी, धर्मराज घोडके, बजरंग देवमारे, आदित्य फत्तेपुरकर, सचीन कुलकर्णी, हरीभाऊ आराध्ये, डि.व्हि.कुलकर्णी, सुरेका कुलकर्णी, शितल येळे, डॉ माळी, रोहीत देशपांडे, सगुण लोखंडे आदी उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Case filed against unlicensed seed selling company and two sellers.

विनापरवाना बियाणे विक्री कंपनी व दोन विक्रेत्यावर गुन्हे दाखल. उस्मानाबाद:- सालासर कृषि ॲग्रो, पिपलीयामंडी, मंदसौर ,मध्यप्रदेश उत्पादित व पतंजली बायो रिसर्च इन्स्टीटूट प्रा.लि.फुड हर्बल पार्क 8,पदार्था लष्कर रोड,हरिद्वार,उत्तराखंड यांनी विपनन केलेले सोयाबीन बियाणे वाण-जे.एस.335 महाराष्ट्र राज्याचा विक्रीचा परवाना न घेता विक्री केल्याचे आढळुन आल्याने संबधीत कंपनीवर तसेच कृष्णाई शेती विकास […]