Online Faculty Development Program in the First Year Diploma Engineering Department of Swaree

M Marathi Editor
Read Time:4 Minute, 5 Second

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक), पंढरपूर मधील प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग विभागात दि. २८ जून ते ०२ जुलै २०२० या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये ‘इम्प्रूवींग कम्युनिकेशन स्कील्स’ या विषयावर ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम नुकताच संपन्न झाला.

जगभरातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे गरजेचे असते. येत्या दशकामध्ये सर्वांसाठी सर्वांगीण प्रगती आणि उपलब्ध होणाऱ्या संधी सर्वांपर्यंत कम्युनिकेशन स्कील्सच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने हा प्रोग्राम विनाशुल्क आयोजित करण्यात आला होता. विविध बौद्धिक उपक्रमांसाठी स्वेरी नेहमीच प्रोत्साहन देत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली डिप्लोमा इंजिनिअरिंगचे सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक कार्यरत असतात. या कार्यशाळेत झाडबुके महाविद्यालय बार्शीचे डॉ. मनोज गादेकर यांनी ‘कम्युनिकेशनचा मुलभूत पाया आणि सध्याची आव्हाने’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. पंढरपूरच्या उमा महाविद्यालयाचे प्रा. अविनाश देशपांडे ‘कम्युनिकेटीव्ह कॉम्पिटन्स’ यांनी मार्गदर्शन केले तसेच शिवाजी पॉलीटेक्निक सांगोल्याचे प्रा. पंजाबराव चव्हाण यांनी ‘कम्युनिकेशनचे शिक्षकांसाठी असणारे महत्व’, स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी)चे प्रा. बापूसाहेब सवासे व प्रा. राहुल नागणे यांनी देखील ‘कम्युनिकेशन स्कील्स डेव्हलपमेंट स्टॅटर्जी व एल.एस. आर. डब्ल्यु. स्कील डेव्हलपमेंट’ या विषयावर सविस्तर माहिती दिली. सदर ऑनलाईन प्रोग्राम दररोज गुगल मीट ॲपद्वारे प्रक्षेपित करण्यात येत होता. त्याचबरोबर सहभागी स्टाफकडून सबंधित ऑनलाईन प्रश्नावली देखील सोडवण्यात आल्या. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीमध्ये अत्यंत अनुभवी मान्यवरांमार्फत अतिशय मौल्यवान मार्गदर्शन उपलब्ध केल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. एस.एस. गायकवाड, समन्वयक प्रा.डी.पी. गानमोटे आणि प्रा. एम. एम. मोरे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग यांनीही परिश्रम घेतले तर या प्रोग्राममध्ये पदविका अभियांत्रिकीच्या विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील एकूण २५० जणांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धाराशिव साखर कारखाना युनिट 1, नवव्या गळीत हंगाम मिल रोलरचे पूजन

धाराशिव साखर कारखाना युनिट१ उस्मानाबाद येथील नवव्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कारखान्याचे संचालक दिलीप बापू धोत्रे यांच्या शुभहस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह पार पडले. उस्मानाबाद जिल्ह्य़ात यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण झाली असून यंदा पाऊसाचे हि प्रमाण सगळीकडे चांगल्याप्रकारे आहे. याहंगामात कारखाने लवकर […]