Support of Swabhimani Shetkari Sanghatana’s Dudh Bandh Andolan – Maratha Mavla Sanghatana – Raj Avtade-Patil

M Marathi Editor
Read Time:2 Minute, 42 Second

दुधाचा थेंबही जिल्हाबाहेर जाऊ देणार नाही …

मोहोळ /प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजु शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला मराठा मावळा संघटना सोलापुर जिल्हा जाहीर पाठींबा देणार असुन, आज मराठा मावळा संघटनेची आँनलाईन बैठक पार पडली या बैठकीमध्ये खासदार राजु शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी दुध बंद आंदोलनाला पाठींबा देण्याची चर्चा झाली यामध्ये मराठा मावळा संघटन चे अध्यक्ष माणिकराव शिंदे, हनुमंत कदम, यु.प्रदेशाध्यक्ष राज आवताडे-पाटील यांच्या व इतर सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते पाठिंबा जाहीर केला.

सध्या राज्यात गाईच्या दुधाचा दर 17 ते 18 रूपये लिटर आहे परंतू पाण्याच्या बॉटलचा दर 20 रुपये आहे ,ग्रामीण भागातील अर्थव्यस्था हि दुधावर अवलंबुन आहे कोट्यावधी छोटे शेतकरी दुध व्यवसायाशी संबंधीत आहेत मात्र दुध दर कमी झाल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोलमाडली आहे त्यामुळे दुध दरात वाढ होणे गरजेचे आहे सरकारने याकडे लवकरात लवकर निर्णय घेऊन दुधदरात वाढ करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षेतेखाली राज्यभर मराठा मावळा संघटनेच्या वतीने त्रीव आंदोलन छेडण्यात येईल अशी माहीती मराठा मावळा संघटन युवक प्रदेशाध्यक्ष राज आवताडे-पाटील यांनी प्रसार माध्यमांनी बोलताना दिली.

या आँनलाईन बैठकीमध्ये ,प्रदेश उपाध्यक्ष भानुदास पवार, जिल्हाध्यक्ष कान्हा कदम ,जिल्हा संघटक संतोष कस्तुरे युवती जिल्हाध्यक्ष राधा मलपे, महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी जाधव, सोनल जाधव ,जिल्हाउपाध्यक्ष राजकिरण पाटील, तालुकाध्यक्ष दिपक चटके,अॅड महेश अटकळे रोहन आसबे, महेश खटकाळे व इतर पदाधिकारी उपास्थित होते

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

City council master plan to prevent corona infection; The mayor informed that an independent comprehensive committee has been formed for the ward

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगर परिषदेचा मास्टर प्लॉन ; प्रभागासाठी स्वतंत्र सर्वसमावेशक कमीटी बनवल्याची नगराध्यक्षांची  माहीती