तु.भ. सैनिकी विद्यालयाचा अभ्युदय हुंडेकरी वाकणकर चित्रकला स्पर्धेत प्रथम.

M Marathi Editor
Read Time:2 Minute, 42 Second

तु.भ. सैनिकी विद्यालयाचा अभ्युदय हुंडेकरी वाकणकर चित्रकला स्पर्धेत प्रथम

तुळजापूर

संस्कार भारती तुळजापूर यांच्यावतीने डॉक्टर हरिभाऊ वाकणकर जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी अभ्युदय दिगंबर हुंडेकरी कधी याला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

तुळजापूर तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये तुळजापूर, अणदुर, नळदुर्ग, खुदावाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये शुभ सैनिकी विद्यालयाचा अभ्युदय दिगंबर हुंडेकरी प्रथम, कुलस्वामिनी विद्यालयाची शिवअस्मिता गोविंद साठे द्वितीय, जिल्हा परिषद खुदावाडी येथील अवंती धनाजी नरवडे तृतीय, आणि उत्तेजनार्थ पारितोषिकामध्ये तुळजाभवानी सैनिकी विद्यालय येथील सोनवणे दीपा गौतम, विनायक किशोर गळाकाटे, जि प खुदावाडी येथील श्रावणी गंगाधर कापसे प्रगती माणिक कबाडे, कुलस्वामिनी विद्यालयाची अंकिता प्रमोद क्षीरसागर यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरातत्वतज्ञ व संस्कार भारती चे संस्थापक महामंत्री डॉक्टर हरिभाऊ वाकडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष पद्माकर मोकाशे व चित्रकला विभागाचे नंदकुमार पोतदार यांनी परीक्षण केले. तुळजापूर संस्कार भारतीच्या वतीने सर्व विजेत्या कलाकारांचे अभिनंदन करण्यात आले असून सहभागी झालेल्या सर्व चित्रकार विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे समारंभपूर्वक सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण केले जाईल अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Student of Tulja Bhavani Military School Selection of Arun Unde as Deputy Collector

तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून अरुण उंडे यांची निवड तुळजापूर : उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील रहीवासी असलेले अरुण विलासराव उंडे यांचा एम.पी.एस. सी. परिक्षेत उत्तीर्ण उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे . अरुण उंडे यांचे ५ वी ते १० पर्यंतचे शालेय शिक्षण तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी […]