The unfortunate end of three children drowning … Incident at Islapur Chikhali …

Read Time:3 Minute, 31 Second

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील (इस्लापूर) चिखली गावालगत असलेल्या नाल्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिन बालकांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक २८ रोजी दुपारी दिड वाजल्याच्या सुमारास घडली.चिखली येथील प्राथमीक शाळेमध्ये शिक्षण घेणारे तिन बालक, गंगाधर लक्ष्मण भंडरवाड.वय १४ वर्ष, रितेश विठ्ठल देशटीवाड,वय ११ वर्ष, श्रीकर गोपाळ नागुवाड वय १४ वर्ष, हे तिनं बालक गावाजवळच्या नाल्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या असता नाल्यातील पाण्याचा अंदाज न लागल्याने त्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना गावातील तरूण लक्ष्मण तोकलवाड, राजु तोकलवाड,प्रविन झरीवाड, महेश मलीकंटलू, यांना कळताच घटना स्थळाकडे धाव घेऊन या तिनही बालकांना पाण्यातून बाहेर काढले असताना यातील दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला.एकाची प्रकृती गंभीर असल्या कारणाने अप्पारापेठ उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेची माहिती चिखली येथील सरपंच देविदास तोटावाड, विठ्ठल सिंगरवाड, सुरेश झरीवाड,यांना कळताच तात्काळ इस्लापूर पोलीसांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किणगे व सहाय्यक उप पोलीस निरीक्षक, श्रीकांत कांदे,पोलीस कर्मचारी रामेश्वर आलेवार, संदिप साळवे, राठोड,मंडळ अधिकारी सानप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी शिवणी येथिल प्राथमीक आरोग्य केंद्रात आणले असता येथिल वैद्यकीय अधिकारी के एस मुंडे, डॉ,डी ई वाडेकर,यांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
सदरील घटनेची माहिती कळताच शिवसेनेचे युवा नेते गजानन बच्चेवार,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बालाजी आलेवार, यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करून शालेय मार्फत राबवल्या जाणाऱ्या राजीव गांधी अपघाती योजने अंतर्गत या मृत विद्यार्थ्यांच्या कुंटूबीयाना लाभ मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील व आमदार भीमराव केराम यांच्या कडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

या दुर्दैवी घटनेमुळे इस्लापूर शिवणी परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

Various social activities on the occasion of the birth centenary of Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe ...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त महेश कांबळे व कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा सोलापूर यांच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 100 प्रतिमा भेट म्हणून सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती तसेच विविध कार्यालय व शाळा व संस्था याठिकाणी लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा भेट म्हणून […]